फलटण:तालुक्यातील मुंजवडी येथे शेतीला पाणी देण्याच्या कारणावरून चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० तारखेला सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. मुंजवडी येथील शेतात उसाला पाणी पाजण्यावरून दोन चुलत भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मठपती हे करत आहेत. शेतीच्या वादातून कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये अशा प्रकारे तणाव निर्माण झाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.