सातारा:कराडमधील 'दि यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., फलटण (शाखा कराड)' या बँकेत गुंतवणूक केलेल्या हजारो ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे प्रकरण आता अधिक तापले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली असून, पीडित ठेवीदार आणि कर्जदारांना महत्त्वाची कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी हजर राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
कराड शहर पोलीस ठाण्यात या बँकेविरुद्ध गुन्हा नोंद क्र. ११६८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९' नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा करत असून, पोलीस उपनिरीक्षक रऊफ इनामदार यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तपासादरम्यान समोर आले आहे की, या बँकेचे कार्यक्षेत्र केवळ सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित नसून सोलापूर, पुणे, सांगली आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतही पसरलेले आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांतील हजारो गुंतवणूकदारांचे पैसे या बँकेत अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी किंवा कर्जदारांनी या बँकेत आर्थिक व्यवहार केले आहेत, त्यांनी खालील वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे:
तपासासाठी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन स्पष्ट झेरॉक्स प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे:
हे प्रकरण मोठे असल्याने आणि यात अनेक जिल्ह्यांतील लोकांचा पैसा अडकला असल्याने, सर्वांनी दिलेल्या वेळेत आपली कागदपत्रे जमा करून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होऊ नये.