फलटण: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. सातारा, पुणे आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मनोज राजेंद्र हिप्परकर याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करत असताना, गुन्हे प्रकटीकरण शाखेला महतपुरा पेठ (मलठण) येथे एक तडीपार गुन्हेगार लपून बसल्याची माहिती मिळाली. १४ मार्च रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता, मनोज हिप्परकर हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
पोलिसांचा इशारा: "निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्या किंवा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही."
या धडक कारवाईमुळे फलटणमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, शहर पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.