एल के सरतापे/ म्हसवड :- काल बुधवारी दिवसभर पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे माणगंगा नदी तिसर्या वेळी ३० ते ३२ वर्षानंतर प्रथमच यात्रा पटांगण ,गार्डन, नाथ मंदिर बायपास रोड, कोटातील महादेव मंदिर ,काझी मळा, स्मशानभुमि, परिसरात पहिल्यांदाच पुराचे पाणी शिरल्याने पालिके तर्फे व स्थानिक नागरीकांच्या वतीने नागरीकांना पुराच्या पाण्याविषय जागृत करण्यात आले होते तर यात्रा पटांगणावरील म्हसवड आटपाडी, जत, वाळेखिंडी पुल पूर्ण पाण्याखाली गेला होता, नदी लगता असलेल्या स्मशानभुमी मध्ये पुराचे पाणी शिरल्याने निवार्यासाठी झोपलेली कुत्री अडकली होती नदी लगतची शेती पाण्याखाली गेली होती ३२ वर्षात दुसर्यांदा माणगंगेला आलेल्या पुराने यात्रा पटांगणावर पाण्याने वेढा दिला होता तर देवापुर येथील बंधार्या नजिक असलेल्या विहरीतील ईले.मोटार काढण्यासाठी गेलेला युवक सुनिल सोपान बाबर पाण्यात पडुन मृत्यु झाला तर कालच्या पावसाने नदीला आलेल्या पाण्याने दहिवडे मळ्या शेजारी राहणार्या चार ते पाच जाधव कुटुंबाच्या घरांना नदीच्या व नागोबा कडुन आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वेढा दिला होता त्यांना बाहेर काढण्यासाठी कराडवरुन पालीकेने बोट व रेस्कीयु टिम बोलवली आसुन कालच्या धुवाधार पावसाने नदी, नाले, ओढ़े, बंधारे, तलाव भरुन वाहील्याने सातारा पंढरपुर रोड, माळशिरस रोड, शिंगणापुर रोड, मायणी रोड आटपाडी रोड आज सकाळी आकरा पर्यात बंद होते तर आज वादळी वारा ,विजांचा कडकडांटाचा वेधशाळेने दिलेला अंदाज दुपारी चार पर्यात फेल गेला असल्याची चर्चा मात्र नागरीकांत सुरु होती
मंगळवारी रात्री आकरावाजता सुरु झालेला पाऊस बुधवारी दिवसभर व गुरुवारी पहाटे पर्यात म्हणजे जवळ जवळ तीस तास एकसारखा पडत होता असल्याने बुधारी अनेकांना भिती वाटत होती सतत पडणार्या पावसाने यापूर्वी अनेक धोके म्हसवडकरांनी पाहीले असल्याने भितीच्या छायेत नागरीको होते विशेषता माळवादी घरात राहणार्याच्या झोपा उडाल्या होत्या १८ वर्षापूर्वी सिध्दनाथ यात्रेच्यावेळी झालेल्या पावसाने माणगंगेला पुर आला होता त्यावेळी ही यात्रा पटांगणावर पाणी आले होते त्यावेळी पुलाच्या खाली चार फुट पाणी वाहत होते त्या पाण्यात पाळणेवाला वाहुन गेला होता त्यावेळी नदीवर बंधारा नव्हता यावेळी मात्र नदीवर माणदेशीने बांधलेल्या बंधार्याने पाण्याचा फुगवटा गावाकडील बाजुस झाल्याने पहिल्यांदाच पाण्याने यात्रा पटांगणावरील रथगृहाला वेढा घातला तर नाथ मंदिरा मागील बायपास रोड पाण्याखाली जाऊं मंदिराच्या मागील पायर्यावर नदीचे पाणी आले होते नदीच्या पडीकडील बाजुच्या शेतीत पाणी शिरले होते केवटे मळा, झगडेमळा, दहिवडे मळा, गुरवकी भागातील नागरीक आडकुण पडले होते नदीपात्रावरील विश्रामगृहा नजीक असलेला बंधार्यावरुन पाणी वाहत होते या पाण्याने प्रवाह बदलुन नदी लगता राहणार्या जाधव कुटुंबाच्या पांच घरांना नदीच्या पाण्याने एका बाजुने वेढा दिला तर दुसरीकडुन नागोबा कडुन आलेल्या ओढ्याच्या पाण्याने वेढा दिल्याने पहाटे तिन पासुन गुरुवारी सांयकाळ पर्यात आडकुन पडले होते पालिकेने त्या पांच कुटुंबाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी कराडवरुन पालीकेने बोट व रेस्कीयु टिम बोलवली असुन हि टिम सांयकाळी सहा पर्यात आल्या नंतर बचाव कार्य सुरु होईल काल पडलेल्या पावसाने पाणीच पाणी सर्वात्र झाले होते स्मशानभुमीत पाण्याच्या वेढ्यात आडकलेल्या कुत्र्यांच्या थव्यानी गोंधळ घालून ओरड्यास सुर्वात केली मात्र बाहेर पडण्यास जागा नसल्याने त्याचे व्हिवळने सुरु होते कालच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन डांळींब, चिक्कू, द्राक्ष लागवडीच्या बागा मधील फळाचे, कांद्याचे, बाजरी, भईमुग मुग आदी पिके हाता तोंडाला आलेली अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले तर या पावसामुळे माण तालुक्यातील अनेक ओढ्यांना पुर आल्याने शिंगणापुर , दहिवडी,पंढरपुर रोडवरील, माळशिरस, मायणी रोड गुरुवारीी आकरा पर्याात बंद होताा माणगंगा नदीला बुधवारी रात्री अचानक पुरपरीस्थीती निर्माण होऊन यात्रा पटांगणावर पाणी आले होते या अवकाळी पाऊसने मात्र शेतकर्याच्या तोंडचा घास हिरवून मोठे नुकसान केले आहे .
बुधवारी दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते सकाळी आकराच्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसाने माण तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले चार ते पांच तास सलग पावसाने हजेरी लावल्याने बाजरीची काढलेली कणसे पाण्यात तरंगत होती शेतात पावसाच्या पाण्यामुळे तळे झाल्याने लागवड केलेला कांदा