सातारा दि. 18: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजुंसाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां.भ. गिऱ्हे यांनी केले आहे.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प र्खचाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
अधिक माहितीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंहामंडळ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुनी एमआयडीसी रोड बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपूल, सातारा येथे संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. गिऱ्हे यांनी केले आहे.