अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते व आर टी ओ धायगुडे यांच्या हस्ते अनावरण...
प्रतिनिधी : सुरज देवकाते
बारामती :- बी.यु.भंडारी एम जी बारामती शोरूम मध्ये MG Hector आणि आणि MG ZS EV (इलेक्ट्रिक) आशा दोन गाड्यांचा अनावरण सोहळा (दि:१६) रोजी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि डी वाय .आर टी ओ संजय धायगुडे यांच्या हस्ते पार पडला .
यावेळेस एम.जी इंडिया चे विवेक धवन, तसेच बी.यु.भंडारी कडून सौ.वैजयंती शेवडे, अमोल सोमा, सोहेल शेख व सर्व बँकाचे प्रतिनिधी व मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला. या वेळी डॉ.भोईटे व सौ.भोईटे यांनी उपस्थित राहून पहिली इलेक्ट्रॉनिक कार ही खरेदी केली. यावेळी नव्या गाडी बद्दल सांगताना धवन म्हणाले की, (MG Hector first Internet Suv it's human thing ) ही गाडी तुमचं सगळं ऐकते. एम.जी स्टार्ट एसी असे म्हणल की तुमच्या गाडीचा एसी चालू होतो. एम.जी प्ले रेडिओ म्हांटल की रेडिओ चालू होतो. अशी अनेक फीचर्स या गाडी मध्ये आहेत. व दुसरी गाडी म्हणजे एम जी.झेड ईव्ही (MG ZS EV) ही आहे. एम. जी ची फर्स्ट इलेक्ट्रिक SUV जी एका चार्ज मध्ये मध्ये ३५० ते ४०० चा अवरेज देते.अतिशय आरामदायी प्रवासासाठी आणि उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे. भविष्याच्या दृष्टीने ही गाडी फायदेशीर आहे असे वैजयंती शेवडे यांनी या प्रसंगी सांगितले.