Gold Price Today, सोने चांदी आजचा भाव, 23 फेब्रुवारी 2021: नवी दिल्ली : स्थानिक वायदा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोनेच्या भावात तेजी पाहायला मिळाली. सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price)तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी 10:20 वाजता पाच एप्रिल 2021 च्या सोन्याचा वायदा भावात 0.10 टक्के म्हणजे 47 रुपयांची तेजी होऊन प्रती 10 ग्रॅम 46,948 रुपयांवर ट्रेंड करत होता. मागील सत्रात एप्रिल 2021 मध्ये सोन्याच्या किंमती 10 ग्रॅम 46,901 रुपये होते. त्याचप्रमाणे जून २०२१ मध्ये डिलिव्हरी सोन्याच्या (Gold Price)किंमत 41 रुपये म्हणजेच 0.09 टक्क्यांनी वाढून 47,063 रुपये प्रति १० ग्रॅम झाली. मागील सत्रात सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅम 47,022 रुपये होते. विश्लेषकांच्या मते जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्यामुळे या मौल्यवान धातूंच्या स्थानिक किंमतीत वाढ झाली.
वायदा बाजारात चांदीची किंमत (Silver Price in Futures Market)
दुसरीकडे, चांदीबाबत (Silver Price Today in Futures Trading) बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी चांदीच्या किंमतीत तेजी दिसली आहे. एमसीएक्सवर मार्च 2021 च्या चांदीचा भाव सकाळी 10:21 वाजता 232 रुपये म्हणजे 0.33 टक्के तेजीसह 70,664 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गेल्या सत्रात मार्च 2021 मध्ये डिलेव्हरीच्या चांदीची किंमत 70,432 रुपये प्रति किलो होती. दुसऱीकडे मे 2021 च्या चांदीचा भाव 0.31 टक्के म्हणजे 222 रुपयांच्या तेजीसह 71,800 रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. मागील सत्रात मे २०२१ च्या चांदीची किंमत प्रति किलो 71,578 रुपये होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने (Gold Price Today in International Market)
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 3 डॉलर म्हणजे 0.17 टक्के तेजीसह 1,811.40 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय सोन्याचा वैश्विक हाजिर भाव 0.92 टक्के म्हणजे 0.05 डॉलरच्या तेजीसह 1,810.59 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदी (Silver Rate in International Market)
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली. कॉमेक्सवर चांदी मार्च, 2021 वायदा भाव 0.10 डॉलर म्हणजे 0.37 टक्के तेजीसह 28.24 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. या शिवाय चांदीचा वैश्विक हाजिर भाव 0.07 टक्के म्हणजे 0.23 डॉलरच्या तेजीसह 28.07 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर ट्रेंड करत होता.