गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी गावासाठी आलेली लस परस्पर इतर गावांना वाटली गोखळी ग्रामपंचायतीचे सदस्यांनी आरोग्य उपकेंद्र ठोकले टाळे. १४ ऑगस्ट रोजी गोखळी गावासाठी आलेली २५० लस बरड वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परस्पर इतर गावांना वाटली यामुळे लाभार्थी नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागले आहे. अठरा वर्षाच्या पुढील नागरिकांना व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींना ही लस प्राधान्य देणार देण्यात येणार होती. परंतु बरड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर लसीचे परस्पर इतर गावांना वितरण केल्यामुळे गोखळी येथील लाभार्थींना लसीपासून वंचित राहावे लागले. सदर २५० लस गोखळी गावच्या नावे पडली असल्याने पुन्हा गोखळी करांना मिळणाऱ्या लस्सी मध्ये कपात होणार आहे याचा फटका गावातील नागरिकांना बसणार आहे. या घटनेच्या निषेधार्थ गोखळी येथील आरोग्य उपकेंद्रास गोखळी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी टाळे ठोकून निषेध केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य सागर गावडे, अभिजित जगताप, राधेश्याम जाधव आणि उपस्थित होते. बरड वैद्यकीय अधिकारी साळुंखे मॅडम यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास गोखळी ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. साळुंखे मॅडम काटेकोर नियमांचे पालन करत असतील तर दिव्यांगांसाठी आयोजित लसीकरण वेळे शिल्लक लस उपस्थित इतर लाभार्थी नागरिकांना द्यावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली होती मात्र ही लस फक्त दिव्यांगांसाठी झाली आहे ती इतरांना देता येणार नाही असे साळुंके मॅडम यांनी सांगितले होते मग आता गोखळी करांना आलेली लस इतर गावांना वाटण्याचा त्यांना काही अधिकार आहे का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी केला.