फलटणच्या 'मदने' टोळीचा माज उतरवण्याची वेळ!
फलटण : "मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही" असं म्हणतात, पण फलटणच्या काही प्रवृत्तींना तर जिवंतपणीच लोकांच्या स्मशानभूमीवर डल्ला मारायची खाज सुटली आहे. मधोजी कॉलेज समोरील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर रामभाऊ मदने आणि त्याचा मुलगा ओंकार उर्फ झिपऱ्या यांनी जो 'राडा' घातला आहे, तो केवळ जमिनीचा वाद नाही, तर तो एका संपूर्ण समाजाच्या अस्मितेवर आणि श्रद्धेवर केलेला घाला आहे. ज्यांच्या नावावर २५-३० गुन्ह्यांची 'काळा पाटी' आधीच कोरलेली आहे, अशा गावगुंडांनी आता पवित्र स्मशानभूमीलाही सोडले नाही, हे पाहून फलटणची मान शरमेने खाली गेली आहे.
"बोगसगिरीचा कळस"
स्वतःच्या स्वार्थासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे आणि 'रामोशी वतन' असल्याचा खोटा बनाव रचणे, हा या बाप-बेट्यांचा जुनाच धंदा आहे. पण "पापाचा घडा भरला की तो फुटतोच," हे त्यांनी लक्षात ठेवावे. पोलिसांनी बोर्ड काढण्याचे आदेश देऊनही जर हे लोक तिथे फिरत असतील, तर प्रशासन नक्की कोणाच्या दबावाखाली आहे? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
"राजकीय लाचारी आणि सरडावृत्ती"
कालपर्यंत राजे गटाचे पाय धरणाऱ्या या बाप-बेट्यांनी तिथून हकालपट्टी होताच चक्क खासदार गटात शिरकाव केला. यालाच म्हणतात "जिकडे सर सर तिकडे भर भर." पण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) हे चतूर राजकारणी आहेत. केंद्राचे राजकारण पाहणाऱ्या दादांना या 'भाडोत्री' आणि 'उपद्रवी' प्रवृत्ती ओळखायला वेळ लागणार नाही. ज्यांनी आजवर ज्यांच्या ताटात खाल्ले, त्यांनाच छेद दिला, ते उद्या कोणाचे होणार?
"आता न्यायाची प्रतीक्षा"
लिंगायत समाजाच्या भावनांशी खेळण्याचे हे धाडस फलटणची जनता खपवून घेणार नाही. स्मशानभूमी ही केवळ जमीन नसते, तिथे लोकांच्या संवेदना दफन असतात. अशा संवेदनशील जागेवर डल्ला मारणाऱ्या या 'नरभक्षकांचा' बंदोबस्त करणे आता काळाची गरज आहे. प्रशासनाने या गावगुंडांच्या धमक्यांना भीक न घालता, त्यांना त्या जमिनीतून तात्काळ हुसकावून लावावे आणि पीडित समाजाला न्याय द्यावा. अन्यथा, हा वणवा संपूर्ण तालुक्यात पेटल्याशिवाय राहणार नाही