फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. भोजराज नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख पाहुणे श्री. पराग दोषी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तदनंतर फलटण संस्थानचे माजी अधिपती कै. मुधोजीराजे नाईक निंबाळकर, कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि कै. शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करत करण्यात आली.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे, प्रा.अभिजित हिप्परकर, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.