फलटण प्रतिनिधी- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जोरात सुरू झाला आहे.राज्यात दररोज हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळयला लागले आहेत.अशा परिस्थिती सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.मात्र स्वताची व आपल्या कुटुंबातील लोकांची परबा न करता गरिब लोकांना आपल्याकडून काहीतरी मदतीचा हात मिळावा म्हणून हे काळे कुटुंबातील अमोल काळे,कुमार काळे, योगेश काळे, संतोष काळे हे नेहमी २४ तास उपलब्ध असतात.स्वताला गरिबांची मदत हे काळे बंधू कधीच मागे पुढे हटत नाहीत,गेल्या 15 वर्षांपासून रुग्णांच्या सेवेसाठी काळे बंधू हे सतत झटत असतात. या काळात तसं पाहता तर कोविड-१९ च्या काळामध्ये ॲम्बुलन्स ला खूप महत्त्व आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक स्वता अॅम्ब्युलन्स मध्ये बसत नाहीत मात्र या काळात सुद्धा काळे बंधू लोकांच्या सेवत कायमच आहेत.
फलटण मधून एक कोविड पॉझिटिव्ह अत्यंत बिकट अवस्थेत होता त्याचा एच.आर.टी.सी. स्कोअर हा २० होता त्याला कोविडचा अति संसर्ग झाला होता.त्याच्या पासून त्याच्या काही अंतरावर असलेल्या लोकांना कोविड १९ होण्याची दाट शक्यता होती मात्र सर्वज्ञ अॅम्ब्युलन्स सर्व्हिसचे मालक कुमार काळे हे आपल्या जिवाची पर्वा न करता त्या रुग्णांची सेवा म्हणून स्वता पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये त्या उपचारा साठी घेऊन गेले.
रुग्णाला दोन तासाच्या आत मध्ये पुणे येथील रुबी हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं होते परंतु तो रुग्ण दीड तासात पुण्यामध्ये पोहोचवला व त्या रुग्णाचे चक्क प्राण वाचले.तसेच महाराष्ट्र राज्यातील व देशातील अनेकांचे जीव काळे बंधूंनी वाचवले आहेत.