फलटण : वाठार निंबाळकर,शासनाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो मात्र त्या मधून दर्जेदार विकासकामे झाली पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले, सस्तेवाडी ता,फलटण येथील अंगणवाडी इमारत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत व ग्रामपंचायत कार्यालय इमारत भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी संजीवराजे बोलत होते, आमदार दीपक्रराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोंबरे,बाजार समितीचे सदस्य संजय कदम,राम नाईक निंबाळकर, सरपंच ज्ञानेश्वरी कदम,सुदाम कदम,सतीश सस्ते,शंकरराव जाधव, नामदेवराव धुमाळ,उपसरपंच बापूराव शिरतोडे,ग्रामविकास अधिकारी मोहन सुतार,यांची प्रमुख उपस्थिती होती, या वेळी बोलताना संजीवराजे पुढे म्हणाले तीस वर्षांपूर्वी तालुक्यातील गावागावात गतातटाचे राजकारण होते, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खाली काम करताना आपण हे मतभेद संपवून विकासाचे राजकारण करत तालुक्यातील सर्वच गावात सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन चोफेर विकास करण्यासाठी प्रयत्न केला असून या पुढे ही विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला, मात्र विकास कामे पूर्ण करण्यासाठी गावची एकजूट गरजेची असल्याचे आवर्जून उल्लेख केला, विकास कामे करताना सर्वच गावात जागेचा प्रश्न उपस्थित होत असून गावातील नामदेव धुमाळ परिवाराने सामाजिक बांधिलकी मधून जागा उपलब्ध करून दिल्या बद्द्ल यथोचित सन्मान करून आभार व्यक्त केले या वेळी आमदार दीपकराव चव्हाण, सरपंच ज्ञानेश्वरी कदम,संजय कदम,यांनी मनोगत व्यक्त केले, स्वागत सतीशराव सस्ते यांनी केले, आभार आत्माराम सस्ते यांनी मानले, कार्यक्रमा साठी महादेव माने, शाखा अभियंता अजय शितोळे, अजित सस्ते,सुनील वाबळे, सोसायटी चेअरमन चंद्रकांत सुर्यवंशी, अविनाश धुमाळ,सुरेश पखाले, तानाजी धुमाळ, दादा चव्हाण,विजय पानसरे, संजय जाधव, महेश जाधव, जोतिराम मुटेकर, यांच्या सह सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते