फलटण -विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध स्तरावर स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती काम विविध स्तरावर व उपक्रम घेण्यात येत आहे.दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता यशवंतराव चव्हाण क्रीडा ग्राउंड फलटण येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती नोडल अधिकारी जिल्हा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा अर्चना वाघमळे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ अभिजीत जाधव गटविकास अधिकारी फलटण प्रदीप शेंडगे व नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थितीत सपन्न झाला यावेळी नोडल अधिकारी जिल्हा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन यांनी उपस्थित मतदार व विद्यार्थ्यांची संवाद साधून घरी आपल्या आई-बाबांना तसेच आपल्या परिसरात असणारया मतदार यांना मतदान हक्क बजावण्याबाब अहवान करून फलटण चा अभिमान बाळगून फलटण 100% मतदान करण्यासाठी दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी घरा बाहेर पडून मतदान करण्यासाठी अहवान केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा अर्चना वाघमळे यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्यासाठी सांगितले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव यांनी स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती उपक्रम सुरु असल्याचे सांगून मतदार यांनी जागरूक मतदार होऊन मतदान करण्यासाठी अहवान केले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि सुरुवात होऊन मतदान मतदान जनजागृती चे पथनाट्य सादर करण्यात आले व मतदार राजा जागा हो या लोकगीतातून गीत सादर करण्यात आले1000 हजार विध्यार्थी,युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 % मतदान रांगोळी च्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले होते मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने मानवी साखळी द्वारे जनजागृती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच मतदान करण्याचे शपथ घेण्यात आले तसेच तृतीयपंथीय समाजातील मतदार यांनी आपल्या समाजातील लोकांना शंभर टक्के मतदान करणे बाबत आव्हान केले त्यांचा सन्मान करण्यात आला करण्यात आला यावेळी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदान कर 100% फलटणकर, मतदान करा लोकशाही रुजवा अश्या मतदार जनजागृतीच्या घोषवाक्याणी परिसर उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा एक उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी सचिन जाधव यांनी केले यावेळी नगर परिषद फलटण अधिकारी व कर्मचारी तसेच प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक, महाविद्यालय चे विद्यार्थी व नागरिक उपस्थितीत होते