व्यक्तीच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणार्या आपल्यासारख्या गुणी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आदरणीय श्री.बापूराव राजाराम जगताप. जिद्द,चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे दुसरे नाव म्हणजे बापूराव जगताप. व्यक्तीच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणार्या आपल्यासारख्या गुणी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!
भविष्याचा वेध घेणारी दृष्टी आणि कृती यांची जोड असावी लागते या सर्व बाबतीत आपण सजग राहून तळमळीने काम करत आहात.फलटण तालुक्यातील गोखळी या गावामध्ये १जून १९६२ ला त्यांचा जन्म झाला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे.समाजातील गरीब, उपेक्षित, शोषित व वंचित घटकातील लोकांसाठी कायम आपल्या परीने ते मदत करत असतात.लोकांना अनेक मदती ते करत असते.एखादी शासकीय योजना मिळवून देणे असो, एखाद्या विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश असो,एखाद्या रुग्णाचे हॉस्पिटलचे बिल कमी करणे असो,एखाद्या गरीब कुटुंबातील होतकरू मुलांसाठी अर्थसाहाय्य देणं असो यामध्ये ते कायम गुंतलेले असतात.
वैदू मुलांच्या शाळेसाठीचा प्रयत्न : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रतिष्ठान ची ८जुलै २००५ ला स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक,शैक्षणिक कामे त्यांनी केली.याच संस्थेच्या माध्यमातून २००९ मध्ये त्यांनी वैदू मुलांसाठी हंगामी शाळा सुरू केली.वैदू समाज हा भटकंती करणारा समाज असून उदरनिर्वाहासाठी तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपले बिऱ्हाड पाठीवर बांधून जातो.

त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारे मदत करत करते.याचाच भाग म्हणून महात्मा फुले शिक्षण हमी केंद्राच्या माध्यमातून गिरवी नाक्यावरील माळावर पोटापाण्यासाठी आपली पालं टाकून राहिलेल्या वैदू समाजाच्या मुलांसाठी शाळा सुरू केली.
विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सौ.आशा जगताप यांनी स्वतः मुलांना शिकवले. वैदू समाजातील स्त्री - पुरुष सुया, चाळणी, पिना व इतर साहित्य विकून आपला उदरनिर्वाह करतात. आणि त्यांची मुलं चार घरी काही उष्टं खरकटं मागून आणतात यावर आपली भूक शमवत.श्री बाबूराव जगताप यांनी मुलांना गोळा करण्यापासून ते त्यांना अंघोळ घालून त्यांचे केस विंचरणे पर्यंत काम केले.या शाळेला स्वत: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. मुलांना शैक्षणिक साहित्य दिले व खाऊ वाटप केले.तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः शाळेवर जाऊन मुलांना गणवेशाचे वाटप केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री गजानन गनबावले, विस्तार अधिकारी श्री. चंद्रकांत मिसाळ, कांतिलाल भोसले,लायन्स क्लबचे बाहुबली कोठारी, उदय नाळे, अनिल शिंदे, भास्कर गायकवाड, हनुमंतराव जगताप, अजित लंबाते,भाऊसाहेब कापसे उपस्थित होते.लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष श्री वर्धमान दोशी यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी मालोजीराजे बँकेचे संचालक मंगेश जोशी उपस्थित होते अशा प्रकारे समाजातील अनेक दात्यांनी आपल्या परीने या उपक्रमाला मदत करून श्री बाबूराव जगताप यांच्या कामाचे कौतुक केले.महाराष्ट्र बलुतेदार संघटनेच्या सचिव पदापासून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली जातीचे दाखले मिळवून देण्यापासून ते त्यांच्या न्यायी हक्कांसाठी त्यांनी आंदोलने केली.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला धार्मिक उत्सव, शिबिरे, विपश्यना,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण कार्यक्रम व व्याख्यानमालेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.संस्थेच्या वतीने पर्यावरणविषयक जनजागृती, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मोफत रुग्णवाहिका या माध्यमातून समाजसेवा केली.पाच साप्ताहिक रामआदेश ते संपादक असून त्यामधून ते परिवर्तनवादी चळवळ गतिमान करत आहेत. अनेक लेख,व्याख्याने त्यांनी दिली आहेत. अनेक ग्रंथालयांना त्यांनी पुस्तकांचे वाटप केले आहे.फलटण तालुक्यांसह माण,जावली तालुक्यात ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन करून अनेक गावे निर्मल करण्यामध्ये योगदान दिले आहे.यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी मार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त मोहीम अंतर्गत कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला आहे.महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ फलटणचे ते सचिव आहेत.२००२ ते २००६ या कालावधीमध्ये चे फलटण पंचायत समितीचे सदस्य होते.या काळात त्यांनी अनेक लोकहिताची कामे मार्गी लावली. ते फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे कायम शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवकांच्या पतसंस्थेचे चेअरमन होते.या कामासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळाले त्यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळाला आहे.पवारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिबिरात सन्मान ऑल जर्नालिस्ट अँण्ड फ्रेंड्स सर्कल महाराष्ट्राच्या यांचा २००७ मध्ये भरलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात गुणगौरव पुरस्कार, विकास पत्रकारिता कार्यशाळा २०१२ ला यामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
सन २००३ चा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार : सन २००३ चा महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ही त्यांना देण्यात आलेला आहे.हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला.
साप्ताहिक रामआदेश : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना पत्रकारितेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी साप्ताहिक रामआदेश पोर्टल तयार केले.अल्पावधीतच viewers संख्या वाढली आहे.सध्या सर्व फॉर्मेटमध्ये साप्ताहिक रामआदेश अविरतपणे प्रकाशित केले जात आहे.
आदिती आर्ट्स : आदिती आर्ट्स च्या माध्यमातून फ्लेक्स, फलटणमध्ये प्रथमच डोर डिझायनिंग, वॉल डिझाइन, स्टीकर तयार करून आधुनिकतेला त्यांनी प्राधान्य दिले असून पुण्या मुंबईसारख्या मल्टिनॅशनल शहरांमध्ये ज्या सुविधा आहेत त्या फलटणमध्ये त्यांनी आणण्याचं काम केलं आहे. आपण करत असलेले कार्य हे दिशादर्शक आहे. आपल्या पुढील वाटचालीस व कार्यास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!!!आपल्याला उत्तम आरोग्य व सुख समाधान लाभो.
सोमिनाथ घोरपडे,सामाजिक कार्यकर्ता मु.पो.सासकल ता.फलटण जि.सातारा मो.नं.७३८७१४५४०७
इमेल : bhimai05@gmail.com