फलटण हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून इथल्या फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी नेहमीच परिवर्तनवादी विचार संस्थानमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करून तळागाळातील माणसांना सत्तेत नेहमीच संधी प्राप्त करून दिली आहे.विशेष म्हणजे फलटण संस्थानच्या न्यायमंडळावरही अस्पृश्यवर्गाचे प्रतिनिधी होते.तीच परंपरा आजही सुरू असून लोकशाही व्यवस्थेमध्ये त्या - त्या वर्गातील लायक आणि होतकरू माणसांना सत्तेत संधी दिली जात आहे. या लोकशाही परंपरेचा भाग म्हणून विधान परिषदेचे सभापती नाम. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी एक नव्हे, दोन नव्हे तिसर्यांदा अशाच गुणी संयमी व मीतभाषी व्यक्तीला दिली.ती व्यक्ती म्हणजे मान. आमदार दीपकराव चव्हाण. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. आज तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर ते सतत फिरून श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.
मा.आमदार दीपक राव चव्हाण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथपर्यंतचा प्रवास केला. सांप्रदायिक वातावरण असलेल्या कुटुंबात प्राथमिक शिक्षक असलेल्या पित्याच्या व प्रेमळ मातेच्या पोटी जन्म घेतला. स्वार्थ कधी त्यांनी पाहिला नाही.उलट परोपकाराच्या भावनेनं इतरांना आपण काय देऊ शकू याचा विचार या कुटुंबात होता. पाच भावंडं असलेल्या या कुटुंबात येणार्या संकटांवर मात करीत शिक्षण देण्याचा आणि त्यांना योग्य ठिकाणी पोचविण्यासाठी जे जे करता येईल ते ते दीपकरावांच्या वडिलांनी केले दीपक रावांचे प्राथमिक शिक्षण गावच्या म्हणजेच तरडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण फलटण येथे घेतले. एम ए,बी.एड पूर्ण करून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते दाखल झाले.
घरात पारंपारिक वातावरण असल्याने व आई शकुंतला यांचे सुसंस्कार त्यांना घडवत गेले. साहजिकच दीपकरावांना सामाजिक कार्याची आवड लागली. ते विविध कार्यक्रमात सहभागी घेऊ लागले. माणसाचे दु:ख, समाजातील चळवळी, पुरोगामी विचारांचे लढे यांचे त्यांना आकर्षण होते. गावच्या व परिसरातील छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते सहभागी होत त्यांच्यामध्ये असणारी जिद्द काहीतरी करण्याची उमेद आणि सदाचारी वृत्ती यामुळे गावकरी त्यांचा आदर करायचे.त्यातूनच त्यांना गावाच्या विकासाचा कणा असणाऱ्या तरडगाव विकास सोसायटीच्या संचालकपदी घेण्यात आले.शांत स्वभाव, संयमी वृत्ती आणि बुद्धिवादी विचारसरणी यामुळे त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला. लोकशाहीवर नितांत श्रद्धा असणारे दीपकराव स्वत: आमदार असूनही या पदाचा कधीही त्यांनी गर्व बाळगला नाही.नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत राहिले व करत आहेत.आई वडिलांचे उत्तम संस्कार असल्यानेच दीपकराव यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. विधानसभेत दुष्काळावर व शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी नेहमीच आवाज उठवला.विकास निधीसाठी विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. रस्ते, वीज,पाणी या सर्वसामान्य माणसाच्या गरजा त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवल्या.आजही कोणताही भेदभाव न पाहता ते सर्वच गावांना आपल्या विकास निधीतून विविध विकासकामे देत आले आहेत.
विधानसभेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या भागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांना आनंद वाटतो नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री म्हणून सुरू केलेले विविध पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मान. दीपकराव चव्हाण हे आपल्या परीने मदत व पाठपुरावा करत आहेत.फलटणच्या औद्योगिक विकासासाठी त्यांनी आदरणीय नाम. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शर्थीचे प्रयत्न केले यात त्यांना यश आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खास.शरदचंद्रजी पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याच मार्गदर्शनाखाली ते विधानसभेमध्ये प्रभावी काम करत आहेत.संपूर्ण तालुक्यामध्ये व मतदारसंघामध्ये त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे.म्हणूनच त्यांनी थोड्या कालावधीत लोकांच्या हृदयात आपलं स्थान अढळ केले आहे.
इथला शेतकरी, कामगार, शेतमजूर, इथला तरुण व महिला यांच्या न्यायी हक्कांसाठी ते आपले योगदान देत असून त्यांनी सामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू मानला आहे. दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न असो की कामगारांचे लढे असो किंवा दलितांची आंदोलने असो ते नेहमीच या सगळ्या प्रश्नांना सामोरे गेले आहेत व त्यांच्या मदतीला धावून गेले आहेत.आमदार दीपकराव चव्हाण विधानसभेत शोभेची बाहुली बनून राहतील असे हिणवणाऱ्या लोकांना त्यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडून त्यांची बोलती बंद केली आहे.सामान्य माणसांच्या कुटुंबात जन्म घेऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी माणसं ही ध्येयवेडी असतात. कालकथित प्रल्हाद चव्हाण आणि आई शकुंतला चव्हाण या संस्कारक्षम दाम्पत्याचे संस्कार आणि विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा वरदहस्त असल्यानेच ते विधेयक विकासाचे काम करु शकत आहेत.मौजे सासकल या ठिकाणी अनेक विकासकामे त्यांनी दिलेले आहेत.बेरडकी सारख्या वस्तीमध्ये त्यांनी जिल्हा नियोजनमधून विद्युत पोल बसवून लोकांचे अंधाराचे साम्राज्य मिटवले आहे.सभामंडप असतील, बंधारे असतील, फलटण दहिवडी रस्ता ते शासकीय गावठाणात जाणारा आठशे मीटरचे डांबरीकरण असेल,बंदिस्त गटारे असतील, परसबागा असतील यासह अनेक कामे त्यांनी केली आहेत.
अशा या मितभाषी, संयमी आणि कर्तृत्ववान आमदार दीपकराव चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंगलमय हार्दिक शुभेच्छा!!!ज्या फलटण तालुक्याचे नेतृत्व मोठमोठ्या दिग्गजांनी केले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला तसाच ठसा माननीय आमदार दीपकराव चव्हाण उमटतील यात तिळमात्र शंका नाही.त्यांच्या या कार्यात फलटणची जनता त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास कायम सज्ज आहे. तेव्हा आमदार दीपकराव चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मंगलमय हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास हार्दिक सदिच्छा!!!! ????????????????
सोमिनाथ पोपट घोरपडे,सामाजिक कार्यकर्ता
ता.फलटण जि.सातारा
मो.नं. ७३८७१४५४०७
इमेल : bhimai05@gmail.com