फलटण : फलटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्यामार्फत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. परंतु सदरील कामे ही यापूर्वीच विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सत्तेत असताना व विरोधी पक्षात असताना मागणी केलेली आहेत. त्यासाठी वेळोवेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने तत्कालीन मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. परंतु विद्यमान आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आम्ही केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.लटण एस टी बस आगारामध्ये नवीन एस टी बस ची मागणी फार पूर्वीची आहे.2021 - 22 साला मध्येच आम्ही फलटण एस टी बस आगारासाठी नवीन बस मिळाव्यात यासाठी मागणी केली होती. यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत अनेक बैठकाही झाल्या.परंतु शासनाने वेळीच निर्णय घेतले नसल्यामुळे हे काम अपूर्ण राहीले. शासनाने निर्णय घेतला आणि फलटण एसटी आगारासाठी ज्या काही बसेस ची आम्ही यापूर्वीच मागणी केली होती त्या बसेस आल्या. या बसेस फक्त फलटण आगारातच आल्या असे नाही तर महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक आगारासाठी त्यांनी केलेल्या मागणीनुसार नवीन बसेसची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्यामुळे फलटण आगारात आमच्याच मुळे नवीन 10 बसेस आल्या असे जनतेला भासवून विद्यमान आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचे भांडवल करत असल्याचे दीपकराव चव्हाण म्हणाले. फलटण एसटी आगारासाठी या पहिल्यांदाच बसेस आल्या असे काही नाही. यापूर्वीही गेल्या 30 वर्षांमध्ये अनेक वेळा नवीन बसेस आल्या आहेत परंतु त्याचे श्रेय आम्ही कधीच घेतले नाही. आमचे विरोधक अगदी त्यांच्याच पत्राने बसेस आल्या असे सांगत असले तरी पत्र दिले आणि बसेस आल्या असं कधी होत नाही. कोणत्याही एस टी बस आगारासाठी बस मागणी करत असताना एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय कोणत्याही आगारासाठी बस मिळत नाहीत.फलटण एस टी बस आगारासाठी बरीच कामे आपण यावेळी हाती घेऊन त्यासाठी चार-पाच कोटींची कामे मार्गी लावली आहेत. पाणी साठत होते त्या ठिकाणी आता काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. बारामती ला जाणाऱ्या एस टी बसेस थांबण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था यापूर्वीच केली आहे. आजची फलटण एस टी बस आगाराची व्यवस्था चांगली आहे. कुठल्याही एस टी बस आगाराचे सुशोभीकरण व अंतर्गत व्यवस्था या कायम चालू असतात हे मी मान्य करतो. लोकांनी त्यांना संधी दिली आहे त्यांनी ती कामे करावीत.फलटण शहराच्या सुशोभीकरणासाठी फलटण नगर परिषदेमध्ये यापूर्वी दोन पत्रकार परिषदा घेऊन त्यासाठी नगर विकास योजनेतून, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आजही ती कामे सुरू आहेत. परंतु सत्तारूढ गटाकडून या कामांना अडवणूक करणे व नारळ फोडणे यासारखी कामे सुरु आहेत. मी याची अनेक उदाहरण देऊ शकतो. वैयक्तिक माझ्या आमदार फंडातून, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फंडातून आम्ही विविध विकास कामे आणली आहेत.प्रभाग क्र. 6 मध्ये 1 कोटी 50 लाख रुपयातून नदीपात्रातील रिटर्निंग वॉल बांधणे. या कामाचे ही श्रेय घेऊन त्या ठिकाणी त्यांनी नारळ फोडून उदघाटन केले. तेही ठीक आहे परंतु सदर कामाच्या उद्घाटना वेळी आम्हाला बोलवणे हे प्रोटोकॉलला धरून होते. परंतु ते पाळले गेले नाही.अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. नाहीतर येत्या काळामध्ये आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने वागले पाहिजे याचे निर्देश आमच्या पद्धतीने आम्हाला द्यावे लागतील ते आम्ही देऊ. यात सुधारणा झाली नाही तर त्यांच्याशी कशा पद्धतीने आम्हाला बोलायचे त्याची भाषा आम्हाला कळते. कोणतेही काम करत असताना ते पारदर्शक पद्धतीने केलं पाहिजे. सर्व कार्यवाही नियमाने केली पाहिजे. दुसरे उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मध्ये अरविंद पवार ते मुलाणी घर या रस्त्याचे डांबरीकरण त्याचा ही त्यांनी नारळ फोडला. प्रभाकर बर्गे ते जाधव यांचे घर याही रस्त्याचा नारळ त्यांनी फोडला. नाबार्डकडून 1 कोटी 19 लाख चे सेल्फ पूल त्याचेही उद्घाटन त्यांनी केले.ही काही उदाहरणे मी सांगितली आहेत. आत्ताच्या विद्यमान आमदारांना पुढील सहा महिने उद्घाटन करायला पुरेल एवढी कामे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माझ्या फंडातून व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजूर केलेली आहेत. तेव्हा विद्यमान आमदारांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावं एवढे आव्हान मी करत आहे. असे पत्रकार परिषदेत उत्तर देताना दिपकराव चव्हाण म्हणाले.