फलटण (प्रतिनिधी):फलटण तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंजवडी येथील युवा उद्योजक मनोहर भाऊसो निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संजीवराजे यांनी मनोहर निंबाळकर यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मनोहर निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे मुंजवडी आणि परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
या पक्षप्रवेशावेळी तालुक्यातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने:
यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोहर निंबाळकर हे मुंजवडी परिसरातील एक प्रगतशील युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पक्षात येण्याने तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा शिवसेनेला मिळेल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. 'शिवसेनेची कार्यपद्धती आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा निर्णय घेतला आहे,' अशी भावना निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.