फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांच्या फलटण येथील दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये उत्साह संचारला असून त्यांच्या सभेने मतदारांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दीपक चव्हाण यांचा विजय निश्चित झाला आहे कै.मालोजीराजे नाईक निंबाळकर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम, रस्ते व सिंचन मंत्री यांनी केलेल्या कामाचा दाखला देत त्यांच्या दूरदृष्टीचा विचार शरदचंद्रजी पवार यांनी कालच्या सभेत मांडला. फलटण बारामती या दोन्ही तालुक्यातील सुबत्ता व झालेल्या विविध क्षेत्रातील प्रगती विषयी त्यांनी बोलताना दिवंगत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी १९८५ साली निर्माण झालेल्या दुष्काळाच्या स्थितीवर भाष्य केले.दुष्काळामध्ये तयार करण्यात आलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा या दोन कालव्याच्या संबंधी भाष्य केले. त्यांनी त्यांच्या बोलण्यातून कै.मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कामाचे कौतुक करून झालेल्या विकासासाठी त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागते असे स्पष्ट सांगितले.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी साखरवाडी येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करताना केलेल्या भाष्याचा खा.शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.ते म्हणाले," पक्षाचा अध्यक्ष मी,कोणाला तिकीट द्यायचे हे ठरवणार ही मी,त्याचा अधिकार माझ्याकडे आहे.ज्यांनी रामराजेंना आमदार केले असे सांगितले त्यांनाही पहिले आमदारकीचे तिकीट मीच दिल. त्यांना मंत्रिमंडळात ही आम्हीच लोकांनी घेतलं आणि ते म्हणतात रामराजेंना आमदार केले. माझं नशीब चांगलं आहे नाहीतर त्यांनी असं सांगितलं असतं की, पवारांनाही मीच आमदार केलं."अशी मिश्किल टिपणी करून शरदचंद्र पवार यांची खिल्ली उडवली.पुढे ते म्हणाले, "राजकारणात मतभेद असतात परंतु एकमेकांचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळाचे सभासद आहेत. ही पद असतात त्या पदाची प्रतिष्ठाही ठेवायचे असते. आपण ती ठेवली तर लोकही आपल्याकडे त्याच भावनेने बघतात. मात्र जर आपण उगाचच टीका टिपणी केली तर लोक आपल्याबद्दल जाहीर बोलणार नाहीत परंतु त्यांचं आपल्या विषयीचे मत हे चांगले राहणार नाही. रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष,स्वतःच्या कर्तुत्वाने. पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा विचार व ध्येयधोरण मान्य आहेत. आमची सर्व शक्ती तुमच्या पाठीशी राहील. हे त्यांनीच सूत्र सांगितलं. त्यांच्या तिसऱ्या टर्मला सभापती करण्यासंबंधी विचार पुढे आला.तेव्हा सर्वानुमते त्यांचेच नाव पुढे आले आणि आम्ही त्यांना सभापती केले. खा.शरदचंद्र पवार यांनी रामराजे यांच्या कार्याचे कौतुक केले. महिलांची सुरक्षा, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांची होत चाललेली दयनीय अवस्था यावर भाष्य करताना ते म्हणाले पुढे ,“लाडक्या बहिणींना अर्थसहाय्याची नाही तर संरक्षणाची आवश्यकता आहे.दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या घटना आज पोलीस स्टेशनमध्ये नोंद होत आहेत.या सरकारच्या कालखंडामध्ये २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.महिला, शेतकरी आणि तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर नोकरीसारखा प्रश्न आज गंभीर झालेला आहे. चित्र असं दिसतंय की मुलांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यामध्ये निराशा होत आहे”, असेही खा.शरद पवार यांनी यावेळी अधोरेखित केले. कृष्णा खोरे प्रकल्पाच्या कामासंबंधी बोलताना त्याचे सर्व श्रेय खा.शरदचंद्र पवार यांनी रामराजेंना दिले.ते म्हणाले, आपल्या कुटुंबाचा विधायक विकासाचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाताना कृष्णा खोरे प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी रामराजे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ते काम स्वतःच्या कर्तुत्वाने पूर्णत्वास नेले. त्यांच्या कालखंडातच या कामाला गती आली.आपण ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्यांच्या कामाचा अनुभव आपण घेतला आहे.यात बदल करायचा असेल तर सत्ता बदल शिवाय पर्याय नाही.त्यासाठी सर्वांनी दीपक चव्हाण यांना विजयी करावे.ही आपणाला विनंती करत आहे.असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले.