फलटण : अजितदादा पवार यांनी फलटण येथे महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेला प्रचार सभेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व फलटणच्या विकास कामाबद्दल व स्थितीबद्दल केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादा पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं खंडन केले. ते म्हणाले, "या सभेमध्ये अजितदादा पवार यांनी अत्यंत निरर्थक असे उपस्थित केलेले प्रश्न व आरोप यावरून त्यांना फलटणची माहिती नसावी असे दिसून येते. फलटणमध्ये सीबीएसई बोर्डाची इंग्लिश माध्यमाची शाळा नाही असे बोलणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीची CBSE बोर्डाची इंग्रजी माध्यमाची अत्यंत अद्यावत अशी शाळा आहेच. परंतु इतर संस्थांच्याही CBSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.फलटण येथे श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून हॉकी आणि फुटबॉल चे अत्यंत चांगले क्रीडांगण ही उपलब्ध आहे. कदाचित अजितदादांना माहिती नसेल की, फलटणच्या तीन मुली भारताच्या हॉकी संघामध्ये खेळतात.आर्चरी मध्ये फलटणचा प्रवीण जाधव हा ऑलिंपिक मध्ये प्रतिनिधित्व करत असतो.फलटणला क्रीडा क्षेत्रामध्ये अनेकांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आहे.त्यांनी खो - खो, फुटबॉल व हॉकीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. सातत्याने फलटणचे फुटबॉल, हॉकी, खो-खो चे संघ विभागीय व राष्ट्रीय स्तरावर जिंकताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अजितदादांना अर्धवट माहिती त्यांच्या पाठीमागील लोकांनी पुरवली असेल. गोविंद मिल्क बद्दल त्यांनी आपल्या भाषणामध्ये भाष्य केले.त्यामध्ये गोविंद मिल्क चे पाणी हे ओढ्याला सोडले जाते व तिथून ते नीरा नदीमध्ये जाते असा आरोप त्यांनी केला. वस्तुस्थिती पाहता फलटण तालुक्यामध्ये कुठल्याही संस्थेचे व उद्योगांचे पाणी हे नीरा नदीपर्यंत पोहोचत नाही. आमच्या गोविंद मिल्क ची अद्यावत ETP सिस्टम आहे. अगदी तुम्ही त्या ठिकाणी बसून चहाही पिऊ शकता. एवढी स्वच्छ ETP सिस्टीम आहे. या सिस्टीम मधून बाहेर पडणारे पाणी हे शेतीला वापरण्या योग्य पाणी आहे.या पाण्याचा वापर आम्ही आमच्या गाड्या धुण्यासाठी,इतर कामासाठी व शेतीसाठी ही करतो.आमचा पाण्याचा एकही थेंब बाहेर जात नाही. हे कदाचित त्यांना माहिती नसावं. उलट मी त्यांना चहाचे आमंत्रण देईन की त्या ETP सिस्टीमवर बसून चहा प्या. वास सुद्धा येणार नाही. ती ETP सिस्टम मी आपणाला दाखवही शकतो व त्या ठिकाणी कोणीही जाऊन ते पाहू शकता.त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. सगळ्यात हसण्यासारखा आरोप म्हणजे कमिन्समध्ये कामगारांना कमी पगार दिला जातो. कमिन्स सारख्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कामगारांना जर कमी पगार दिला जात असता तर त्या ठिकाणी त्याचा बाबरा कितीतरी मोठ्या प्रमाणात झाला असता. कदाचित अजितदादांना जे फीडिंग करण्यात आलेले आहे त्यांनाच ते नीट माहिती नसावे. कमिन्स संदर्भात माझ्याकडे जी कागदपत्र आहेत ती मी कधीही द्यायला तयार आहे. त्यामध्ये त्यांनी दाखवून द्यावे की कोणत्याही कॉन्ट्रॅक्टदारांना नियमाच्या बाहेर जाऊन कमिन्स सारखी मल्टिनॅशनल कंपनी पगार देते.माझं त्या सर्वांना जाहीर आव्हान आहे की, यापैकी एक जरी रुपया माझ्या, रामराजांच्या, रघुनाथराजेंच्या खिशात जात असेल तर राजकारण सोडीन नाहीतर तुम्ही राजकारण सोडा. मार्केट कमिटीत सांगितले जाते पगार वेळेवर होत नाहीत. उलट दिवाळीचा ऍडव्हान्स मध्ये पगार मार्केट कमिटीने केला आहे. फलटण तालुक्यातील सर्वच संस्था अत्यंत उत्तम रीतीने चालू आहेत.आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. जो सल्ल्याला जाईल त्याच्या संस्था तुम्ही गिळंकृत करता. त्यामुळे आम्हाला सल्ल्याची गरज नाही आमच्या संस्था व्यवस्थित चालल्या आहेत.श्रीमंत मालोजीराजे बँक ही अत्यंत व्यवस्थित चाललेली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक बँका आहेत SAS मधून बाहेर पडलेल्या दोन बँका आहेत त्यामध्ये मालोजीराजे सहकारी बँक आहे.त्यामुळे निरर्थक आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यांना जी माहिती पुरवली असेल त्या माहितीच्या आधारे दुर्दैवाने त्यांनी आरोप केले असतील.श्रीराम सहकारी साखर कारखाना व जवाहर यांच्यासोबत जो काय करार झाला त्या कराराच्या माध्यमातून गाळप क्षमता वाढवायची त्यानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 5 टन प्रतिदिनी ही केलेली आहे. वर्षभरात ते दहा हजार टन प्रतिदिनी करण्याच्या दृष्टीने सर्व तरतूद केकेली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर द्यायच्या असा उद्देश श्रीराम व जवाहर च्या भागीदारीत आहे. यामध्ये श्रीराम ने पैसे कमवावेत हा उद्देश अजिबात नाही. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त पैसे मिळावे व जी देणी आहेत ती देता यावीत यासाठी जवाहर कडून आम्ही ज्यादा पैसे घेतो.आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर देण्याचा प्रयत्न आपला असतो.आपण कोणतेही कर्ज काढले नाही. जवाहर न दिलेल्या साडेआठ कोटीवर आपण व्याज देतो.ते बँक दराप्रमाणेच आपण देतो. बाकीचे जे साडेआठ कोटी आहे ते आपल्याला त्यांनी बिनव्याजी दिलेले आहे. खंडाळा औद्योगिक विकास महामंडळाच्या(MIDC)संदर्भात आपण विचार केला तर त्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आपण काम करत होतो. कमिन्स कारखाना फलटणला आला यामध्ये श्रीमंत रामराजेंचे प्रयत्न होते. परंतु त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्यामुळे हा कारखाना फलटणला आला. लोणंद एमआयडीसी साठी मी स्वतः प्रयत्न केले आहेत.श्रीमंत रामराजेंचे प्रयत्न केले. त्या ठिकाणी विविध कारखाने आणणे यासाठीही खूप प्रयत्न करावे लागले. फलटण एमआयडीसी ची स्थापना 1997 साली झाली. त्यानंतर कमिन्स येण्यासाठी जवळजवळ नऊ वर्ष कालावधी लागला. लोणचं ही तसंच झालं. खंडाळा पुण्याच्याजवळ असल्यामुळे आणि पहिल्यापासूनच खंडाळ्यामध्ये कंपनी येण्यास उत्सुक असल्यामुळे खंडाळा एमआयडीसी त्या ठिकाणी आली. त्यासाठी लागणारी वीज पाणी या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये श्रीमंत रामराजें योगदान प्रयत्न होते.केसुर्डी,शिंदेवाडी याभागात खंडाळा एमआयडीसी उभे राहत असताना सर्वांचेच एकत्रित प्रयत्न झाले. यावेळेस श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे यांच्या आमदारकी संदर्भात स्पष्ट शब्दात खुलासा करून अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाबाबत व त्या पाठीमागची पार्श्वभूमी पत्रकारांना समजून सांगितली. हे बोलताना पक्षामध्ये होणारी गळचेपी यावरही त्यांनी भाष्य केले. आमच्या फलटणच्या सर्व संस्था ऊर्जेत अवस्थेतच आहेत. त्यामुळे त्यामध्ये काही करण्याची गरज नाही. जरंडेश्वर आता खाजगी झालेला आहे मात्र श्रीराम हा सहकारी होता आणि तो कायम सहकारीच राहील असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना निक्षून सांगितले. बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, बारामती मध्ये औद्योगिक प्रगती खूप झपाट्याने आणि चांगली झालेली आहे हे आम्ही नाकारत नाही. ती होण्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. जी गावे बारामती पासून जवळ आहेत त्या गावातील तरुण रोजगारासाठी बारामती मध्ये जाऊ शकतात. फलटणलाही औद्योगिक प्रगती होत आहे कमिन्स सारखा मेघाप्लांट उभा राहिला आहे. त्यांची १३ युनिट्स आता कार्यान्वित झाली आहेत. येत्या काळामध्ये १७ युनिट्स उभी होणार आहेत. क्यूब इंडिया नावाची कंपनी आली आहे. महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी आलेली आहे. दुर्दैवाने तो समतोल कधीच राखला गेला नाही.फलटण तालुक्याच्या विकासाबद्दल आम्ही देताना मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या असं भाष्य करणाऱ्या अजितदादांना उत्तर देताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, यापूर्वीही त्यांना सर्व तालुक्यांचा विकास करता आला असता. फक्त बोलायला सोपा आहे बारामतीचा विकास होतो. इंदापूरचा होत नाही. दौंडचा होत नाही. पुरंदरचा होत नाही. फलटणचा होत नाही. तेवढा निधी जर तुम्ही उपलब्ध करून दिला तर त्यांचाही विकास निश्चित तेवढाच होईल जेवढा बारामतीचा झाला आहे. रोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दहा वर्षाचा विचार केला तर केंद्र सरकारचे काय रोजगार निर्मिती करणार होते त्यांनी तशी आश्वासने दिली होती. मात्र तसे पोषक वातावरण निर्मिती करण्यात केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन कमी पडले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही मोठे उद्योग हे महाराष्ट्रात उभे राहण्याऐवजी ते गुजरातला गेले की नाही याविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे.विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फलटणच्या जनतेला काय संदेश द्याल असे विचारल्यावर त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,"फलटणच्या बाबतीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे व्हिजन खूप वेगळे आहे. सगळ्यात मोठा व महत्त्वाचा प्रश्न फलटणचा जो आहे तो म्हणजे पाण्याचा तो प्रश्न सर्वात प्रथम रामराजेंनी सोडवलेला आहे. अंतर्गत बंदिस्त सांडपाणी व्यवस्थापनाची गरज होती ती ही आपण पूर्ण केली. पर्यावरणाच्या संदर्भात समतोल राखण्यासाठी आपण अनेक गार्डन्स उभी करतोय. स्वच्छ, सुंदर फलटण हा उद्देश आमच्या यापुढे राहणार आहे.रस्ते चांगले असतील त्यासाठी आम्ही येत्या काळात प्रयत्न करणार आहे.सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,"मुरूम येथे सुभेदार श्रीमंत मल्हार होळकर यांच्या स्मारकासंदर्भात श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे आपल्या फलटण तालुक्यातील मुरूम गावचे आहेत याची कल्पना आम्हाला होती. नंतरच्या काळात जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. नंतर त्या ठिकाणी स्मारक व्हावं यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक राव चव्हाण यांच्या माध्यमातून स्मारकासाठी निधीची मागणी केली. जवळजवळ 29 कोटी रुपयांची मागणी आपण केलेली आहे. त्याठिकाणी काम ही सुरू आहे.अजितदादा पवार यांनी केलेल्या आरोपाचं अत्यंत विश्लेषणात्मक व मुद्देसूद, सडेतोड विश्लेषण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.