फलटण : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची प्रमुख लढत ही आता निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे राजे गटाचे निष्ठावंत विद्यमान आमदार दीपक चव्हाण व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व भारतीय जनता पार्टीच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील अशी थेट दुहेरी लढत होत आहे.
दीपक प्रल्हाद चव्हाण हे शांत,संयमी व सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात.ते उपशिक्षक म्हणूनच शैक्षणिक सेवेत होते. त्यांनी 1993 मध्ये मुधोजी महाविद्यालय फलटण येथून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठातून पदव्युत्तर (एम ए) आणि १९९६ मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न जयवंत आवळे शिक्षण महाविद्यालय इचलकरंजी येथून बीएड चे शिक्षण पूर्ण केले.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व असून २५५ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा स्वतःचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ असल्याने त्यांची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विधायक विकासासाठी प्रयत्नशील आहेत. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व राहिले आहे.२००९ पूर्वी हा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.२००९ मतदारसंघ पुनर्रचनेनंतर फलटण हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ झाला. तरीही २००९,२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण विजयी झाले. ते आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या तुतारी या चिन्हावर चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी आव्हान उभे केले असले तरी आणि त्यांना माजी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांचे पाठबळ असलं तरी तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व कायम असल्याने निवडणुका कशा जिंकायच्या असतात हे यांना चांगलंच ज्ञात आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांचे पारडे जड आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, तालुक्यामध्ये स्वर्गीय चिमणराव कदम यांच्यावर पर्यायाने सह्याद्री चिमणराव कदम यांच्यावर प्रेम करणारा एक मतदार आजही तालुक्यात आहे ते ही दीपकराव चव्हाण यांच्या सोबत असल्याने जिंकण्याच्या दृष्टीने विद्यमान आमदार दीपक राव चव्हाण यांचे पारडे जडच आहे. या मतदारसंघातून दिगंबर आगवणे हेही फॉर्म भरत आहेत. त्यांच्या पत्नी या स्वतः गाव ते गाव, वाड्यावास्त्यांवर लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मताला त्या सुरंग लावताना त्या दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष पर्यायाने राजे गटातून माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर गटामध्ये गेलेले प्रमुख नेते, कार्यकर्ते, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी पदाधिकारी, गाव पातळीवरील प्रमुख कार्यकर्ते हे पुन्हा एकदा राजे गटामध्ये परत येत आहेत.त्यामुळे विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांच्या विजय हा निश्चित आहे. शेवटी ही लढाई अस्तित्वाची असल्याने अप्रत्यक्षपणे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, तसेच श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर ही राजे परिवारातील नवी पिढी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करून विद्यमान आमदार दिपकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाली आहे. त्यामुळे महायुतीचे सचिन कांबळे पाटील यांना कितीही प्रयत्न केला तरीही लढाई जिंकले तितकेसे सोपे नाही. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना सत्तेच्या चाव्या स्वतः च्या हातामध्ये असताना सुद्धा स्वतःचा विजय मिळवता आला नाही. ते काय सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणणार? जसजसे राजकारण तापू लागेल. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचेल तसतसे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते, नेते, राजे गटामध्ये स्वग्रही परतू लागतील. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार दीपकराव चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.