फलटण: फलटण तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, फडतरवाडी येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, राजे गटाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) जाहीर प्रवेश केला आहे. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपची ताकद वाढली असून राजे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
फडतरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रूपाली चंद्रकांत करे, शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख श्री. संकेत शुक्राचार्य बोबडे, श्री. चंद्रकांत नारायण करे आणि श्री. सचिन शिवाजी मदने यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह 'राजे गटाचा' त्याग करून भाजपचा झेंडा हाती धरला.
या जाहीर प्रवेश सोहळ्यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये:
यांच्यासह श्री. दत्तराज फडतरे, श्री. ऋषीकेश शिंदे, श्री. सुनील बनकर, श्री. हनुमंत शिंदे, श्री. बाजीराव जाधव, श्री. वैभव राऊत, श्री. अशोक जाधव आणि भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून हा प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे फडतरवाडी आणि परिसरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.