फलटण (प्रतिनिधी):फलटणच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात उद्या एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. येथील विमानतळाशेजारील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीत 'दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर)' चे उद्घाटन उद्या (रविवार) सकाळी ११.३० वाजता संपन्न होणार आहे. या नवीन न्यायालयामुळे फलटणकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून, सर्वसामान्य पक्षकारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती:
तसेच सातारा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद शं. वाघमारे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
आजवर वरिष्ठ स्तरावरील दिवाणी दाव्यांच्या कामासाठी फलटण आणि परिसरातील नागरिकांना सातारा जिल्हा न्यायालयाची वारी करावी लागत होती. यामुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा यांचा मोठा अपव्यय होत होता. आता हे न्यायालय स्थानिक पातळीवर सुरू होत असल्याने, न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.