२० मार्चपूर्वी होणार पहिली बैठक; महाराष्ट्र शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
फलटण/सातारा:नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर आता सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सातारा जिल्ह्यासह राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
ग्राम विकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी हे पत्र निर्गमित केले आहे. यामध्ये सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक प्राथम्य देऊन तातडीने बैठकांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात आता मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाची माहिती:
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही प्रक्रिया पार पडत असून, विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.